देशात ओमायक्रान विषाणूची बाधा झालेले पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासांत ओमायक्रोन या कोविड विषाणूचा संसर्ग झालेले पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयानं आज जाहीर केलं. ओमायक्रोन विषाणू बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तपास झाला असून त्यांची कोविड चाचणी केली जात आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातले सह सचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्ली इथं  दिली. 

कोविडच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड चाचण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तपास आणि आरोग्य विषयक पायाभूत  सुविधा वाढवण्यावर  लक्ष केंद्रित करावं असे निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत. जोखीम गटातल्या देशांमधून भारतात  येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक असल्याचं ते म्हणाले.