नवी दिल्लीतील व्यापार मेळ्यात “आत्मनिर्भर” संकल्पनेखाली महाराष्ट्रातील औद्योगिक वाटचालीचा आलेख

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा यासारख्या उपक्रमातून भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं दिसतं असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आयोजित या मेळाव्याचं काल गोयल यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या व्यापार मेळाव्यात राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते काल महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रानं  यंदा “आत्मनिर्भर” संकल्पनेखाली राज्यातील औद्योगिक वाटचालीचा आलेख साकारला आहे. येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत हा मेळावा सुरु राहणार आहे.