माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरूवार दि. १८ नोव्हेंबर २०२१  रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर –  https://twitter.com/MahaDGIPR

निवडणूक आयोग दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविते. हा कार्यक्रम नेमका काय, मतदाराने नाव नोंदणीचा अर्ज केल्यानंतर त्यावर निवडणूक कार्यालयाकडून साधारण काय प्रक्रिया केली जाते, हा पुनरिक्षण कार्यक्रम साधारण किती कालावधीचा असतो, दरवर्षी होणाऱ्या मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचं लोकशाही सक्षमीकरणात महत्त्व, तरुण मतदारांच्या जागृतीसाठी काय प्रयत्न केले जातात, १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विशेष मोहिमेच्या निमित्ताने मतदारांना केलेले आवाहन आदी विषयांची माहिती श्री. देशपांडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.