दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेण्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मिठाई तसंच अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी प्रशासनानं दक्ष रहावं, असे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काल पुण्यात दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शिंगणे यांनी काल पिंपरी-चिंचवड इथल्या हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देवून, कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.