देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ९५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल देशभरात २४ हजार ६०२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी ३२ लाख २५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल २० हजार ४३१ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात २ लाख ४४ हजार १९८ एक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण एक टक्क्याच्या खाली घसरला असून आता ते ७२ शतांश टक्के आहे.