नवरात्री उत्सवाच्या निमित्त रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दूरदर्शन रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु करणार आहे. रामानंद सागर यांची ही मालिका पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या स्वरुपात पुढचे दहा दिवस दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवर दाखवली जाईल. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर व्यंपती यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या प्रसारणाचे तपशील जाणून घेण्यासाठी प्रसारभारतीचे ट्विटर आणि डीडी नॅशनल पाहात रहा, असा सल्ला देण्यात आला आहे