केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचं अनावरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय टपाल विभाग, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आज सोलापूरच्या चार हुतात्म्यांवरील टपाल तिकिटाचं अनावरण केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यांचा इतिहास आजपर्यंत जगासमोर आला नाही अशा असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना प्रकाशित करण्याचा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. त्याच माध्यमातून सोलापूरच्या या चार हुतात्म्यांच्या टपाल तिकिटाचं अनावरण झालं असून आता त्यांचा इतिहास  देशवासीयांपर्यंत पोचेल असं चौहान यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सचिन शेट्टी, सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यंनम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image