राज्यात काल २ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सुमारे २ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्या १ हजार ५७३ रुग्णांची नोंद झाली. राज्यात काल ३९ जणांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातल रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४६ शताश टक्के आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या २४ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुमारे २ लाख १ हजार १६२ व्यक्तींना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, तर १ हजार ७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहे.