'एस. टी. संगे पर्यटन' या मोहिमेअंतर्गत नेरळ-माथेरान मिनिबस सेवा सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी. संगे पर्यटन', या मोहिमेअंतर्गत एसटी महामंडळाने आजपासून नेरळ-माथेरान आणि कर्जत-माथेरान अशी मिनिबस  सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ते माथेरान दरम्यानचा प्रवास अवघ्या २५ रूपयात आणि कर्जत माथेरान हा प़वास ४० रूपयात करता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी बचत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी मासिक पासची देखील व्यवस्था केली जात असल्यानं या निर्णयाचं स्वागत होत आहे.