स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त नागपूरात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग असायला हवा आणि ही जनतेची चळवळ व्हायला हवी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त नागपूरातल्या स्थानिक संविधान चौकात आज, संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या शिलालेखातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानातलं अतूट नातं दिसतं असं गडकरी यावेळी म्हणाले. देशाचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना कळावा यासाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. यावेळी सामुहिक ध्वज गीत गायनाचाही कार्यक्रम झाला.