दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सात वेळा अजिंक्यपद भूषवलेला भारतीय संघ आज मालदीवच्या माले इथं दक्षिण आशियायी फुटबॉल महासंघ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत नेपाळशी लढेल. भारतीय संघानं बुधवारी मालदीवला हरवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. यापूर्वी बांग्लादेश आणि श्रीलंकेशी बरोबरीत खेळून भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य राहिला.