राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त देशभरातून मान्यवरांच्या मानवंदना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आज साजरी होत आहे. त्यानिमित्त देशात आणि परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर राजघाट इथं आज सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली लोकसभेचे सभापती ओम बिर्ला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही  यावेळी गांधीजींना श्रद्धांजली वाहिली.

महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही पाळला जातो. माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची 117 वी जयंतीही  आज देशभर साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  आज लाल बहादूर शास्त्री यांचा स्मारक असलेल्या विजय घाट इथं भेट देऊन त्यांना पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ही गांधीजींना  पुष्पांजली अर्पण केली.

अहिंसा हे एक तत्त्वज्ञान आणि अनुभव असून समाज सुधारणेसाठी याचा वापर होऊ शकत असल्यावर गांधींजींचा विश्वादस होता असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, अस्पृश्यता आणि सामाजिक कुप्रथा यांचं निर्मूलन करण्यासाठी, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसंच महिला सबलीकरणासाठी महात्मा गांधी यांनी सतत प्रयत्न केल्याचंही कोविंद यांनी सांगितलं. गांधीजींचं आयुष्य देशासाठी प्रकाशाचा किरण असून देशाच्या प्रगतीसाठी मार्ग दाखवत आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सर्व भारतीयांसाठी गांधी जयंती हा एक विशेष सोहळा असून सर्वांनी गांधीजींचा संघर्ष आणि त्याग यांची आठवण केली पाहिजे असेही ते म्हणाले. गांधी जयंती निमित्त सर्वांना समृद्धी आणि विकासाची प्रेरणा मिळत असल्याचाही राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्वर्गीय लालबहादूरशास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचारांचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे.

माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शास्त्रीजींना वाहिली श्रद्धांजली

माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शास्त्रीजींना श्रद्धांजली वाहिली आहे. शास्त्रीजी यांनी अत्यंत भक्तिभावाने तसाच समर्पित भावनेने आणि साधेपणाने देशसेवा केली असून त्यांची वागणूक आणि विचार हे देश बांधवांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image