नागरिकांना तातडीनं मदत मिळावी म्हणून डायल ११२ लवकरच सुरु – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात नागरिकांना कुठेही १५ मिनिटांत मदत मिळावी यासाठी डायल ११२ हा प्रकल्प राबवला जाणार असून त्याचं लोकार्पण लवकरच केलं जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल पुण्यात वार्तालापात दिली. या प्रकल्पाबद्दल बोलताना वळसे पाटील म्हणाले,महिला सुरक्षाविषयक शक्ती कायद्याच्या संदर्भातील विधेयक आगामी विधानसभा अधिवेशनात मांडल जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता राज्यात ४५ न्यायवैद्यक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य पोलीस दलातली बाराशे आणि नंतर सातशे रिक्त पदं लवकरच भरण्यात येणार आहेत, असंही वळसे पाटील म्हणाले.