येत्या १ नोव्हेंबरपासून सर्व महाविद्यालयं सुरु करायचा राज्यशासनाचा विचार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यातली सर्व महाविद्यालयं सुरु करायचा विचार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधित सीईटी परिक्षा होतील असं त्यांनी सांगितलं. राज्याभरातल्या एकूण २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होईल. यावर्षी एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी सीईटीची परीक्षा देणार आहेत अशी माहिती सामंत यांनी दिली. परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कोविड१९ प्रतिबंधक नियमांचं पालन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं.