मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २७१ दिवसांवर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४२० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १२ हजार १६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३४७ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या  ७ लाख ३५ हजार ४०३ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २७१ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ७४४ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोमुळे ६ रुग्णांचा  मृत्यू झाला असून, एकूण  मृतांचा आकडा १६ हजार २८ वर पोचला आहे.