राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या वितरणाचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या मात्रा नागरिकांना दिल्या आहेत. काल दिवसभरात ७१ लाख ६१ हजार नागरिकांनी लस घेतली. काल ४२ हजार नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली तर सुमारे ३६ हजार रुग्ण कोरोनमुक्त झाले. ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला.  आतापर्यंत देशात ३ कोटी २१ लाखांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ४२ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात ४ लाख १० हजार रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५३ कोटी चाचण्या करण्यात आल्या.