राज्यात आठ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ३८८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ७५ हजार ३९० झाली आहे. काल २०८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३४ हजार ५७२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक अकरा शतांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ३९० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६१ लाख ७५ हजार १० रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ८६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ६२ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image