टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात, नेमबाज सिंघराज अदाना यानं तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदकाची नोंद केली. नेमबाज मनीष नरवालनही याच क्रीडा प्रकारात पदक निश्चितीसाठीच्या फेरीत प्रवेश करून पदकासाठी आव्हान जिवंत ठेवलं आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, क्रीडा मंत्री यांनी सिंघराजचं या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे.