भायखळ्यातील आग्रीपाडा येथील आश्रमातल्या २२ जणांना कोरोनाची लागण

 

मुंबई (वृत्तसंस्था) :तिसऱ्या लाटेची भीती असताना मुंबईच्या भायखळा आग्रीपाडा इथल्या सेंट जोसेफ आश्रमातल्या तब्बल २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १५ लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडास कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली. या आश्रमात कोरोना रुग्ण आढळून आल्यानं पालिकेच्या आरोग्य विभागानं आयोजित केलेल्या आरोग्य शिबीरात आश्रमामधील काम करणारे कर्मचारी आणि मुलांची अशा एकूण ९५ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.