उपनगरीय रेल्वे सर्वांसाठी सुरु करण्यातचा निर्णय विचाराधीन - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असलेली उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे, जबाबदारीचं भान ठेवून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  सध्याच्या निर्बंधांबाबत व्यापाऱ्यांनीही नियम न तोडता संयम बाळगावा, असं आवाहन त्यांनी केलं. मुंबईतल्या एच पश्चिम प्रभागाच्या नुतन वास्तुचं इमारतीचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं चांगलं काम केलं, अशा शब्दात त्यांनी महापालिकेचं कौतुक केलं आहे. विभाग कार्यालयाच्या या इमारतीचं बांधकाम भविष्याचा विचार करुन केलं आहे, ही वास्तू सर्वसामान्यांना जोडणारी आहे. अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात मुंबईतून होते नंतर देशभरात तिचं अनुकरण केलं जातं, असं ते म्हणाले.