देशात सोमवारी ३८ हजार ८८७ रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासात ३०, हजार ५४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३८ हजार ८८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत तीन कोटी १७ लाख २६ हजार ५०७ रुग्णाना कोरोनाची लागण झाली असून एकूण यापैकी तीन कोटी आठ लाख ९६ हजार ३५४ नागरिक बरे झाले आहेत. सध्या देशात एकूण चार लाख चार हजार ९५८ सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात या आजारानं चार लाख २५ हजार १९५ रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत ४७ कोटी ८५ लाख ४४ हजार ११४ लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.