पुण्यातील हॉटेल व्यवसाय सुरु झाल्याने भाजीपाला आणि फळांच्या विक्रीत २० ते २५ टक्के वाढ

 

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील कोरोनाविषयक निर्बंध शिथिल होऊन हॉटेल व्यवसाय सुरु झाल्यानं घाऊक बाजारातील भाजीपाला आणि फळांच्या विक्रीत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. भाजीपाला वाया जाण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. हॉटेल व्यावसायिकांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी मिळाल्यानं ग्राहकांच्या संख्येवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून परतलेले हॉटेल कामगार पुन्हा शहरात येत आहेत.शहरातील तुळशीबाग आणि मंडई परिसर पुन्हा एकदा ग्राहकांनी फुलून गेला असून सणासुदीच्या तोंडावर निर्बंध शिथिल बाजारपेठेत नव चैतन्य दिसून येत आहे.