कोविड १९ मुळं क्षय रोगाचे रुग्ण वाढल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळं क्षय रोगाचे रुग्ण वाढल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं काल केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. कोरोना विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षय रोगाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं असल्याच्या प्रसार माध्यमातल्या बातम्यांनंतर आरोग्य विभागानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. क्षय रोग्यांची कोविड विषयक आणि कोविड रुग्णांची क्षयरोग विषयक चाचणी करावी, असं सुचवण्यात आलं आहे. दोन्ही आजारांची लक्षणं काही प्रमाणात सारखी असून गेल्या २०२० या वर्षात कोविड विषयक बंधनांमुळे क्षय रोगाचे रुग्ण कमी झालं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.