देशात गुरुवारी २ लाख ७ हजार ७१ अधिक रुग्ण कोरोनामुक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत असून, तो ९३ पूर्णांक शून्य आठ टक्के इतका झाला आहे. काल दोन लाख सात हजार ७१ अधिक रुग्ण बरे झाले. तर काल नव्या एक लाख ३२ हजार बाधित रुग्णांची नोंद झाली, तर दोन हजार ७१३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या देशात १६ लाख ३५ हजार ९९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.