मराठी माध्यमाच्या शाळा मंगळवार पासून होणार सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा उद्यापासून सुरु होत आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे यंदाही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच शाळेत येतील, विद्यार्थ्यांना मात्र घरी बसून, ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे.

दरम्यान, विद्या परिषदेच्या शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवरुन सोमवार ते शुक्रवार इयत्तानिहाय तासिकांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. हे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलं आहे.