वंदे भारत मिशनचा आजवर ९० लाखांहून अधिक लोकांना लाभ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकट काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत योजने अंतर्गत आतापर्यंत ९० लाख भारतीयांना विमानाद्वारे जगातल्या विविध देशातून भारतात परत आणण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय नगरी उड्डाण वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे गेल्या वर्षी मे महिन्यापासून वर्षभर ही मोहीम चालू आहे.

वंदे भारत ही जगातील सर्वात मोठी आणि आमच्यासाठी विविध अनुभव शिकवणारी महत्वपूर्ण मोहीम होती असंही पुरी यांनी म्हंटल आहे. दरम्यान, काल या मोहिमे अंतर्गत ३ हजार ४७९ भारतीयांना स्वदेशी आणण्यात आलं. यामध्ये यू ए ई मधून ३२०, सौदी अरेबिया मधून ६५, मलेशियातून ९३ तर कतार मधून ४७ भारतीयांचा समावेश आहे.