जेईई मुख्य परीक्षा पुढं ढकलायचा केंद्रसरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या महिनाअखेरीला होणार असलेली जेईई मुख्य परीक्षा पुढं ढकलायचा निर्णय़ केंद्रसरकारनं घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय़ घेतला असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी ट्विटरवर सांगितलं.

पुढच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीए अर्थात राष्ट्रीय परिक्षण यंत्रणेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.