देशात कोरोना पार्श्वभूमीवर १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काल १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना केली. केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास विभागाशी चर्चा करण्याचा तसंच आपली नियमावली तयार करण्याचा स्वतंत्र अधिकार या कृती दलाला असणार आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेल्या प्रतिदिन एक हजार २०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या आदेशाला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

केंद्र सरकारची ही याचिका फेटाळत न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना केली.

ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता आणि त्याचं वितरण वैज्ञानिक पद्धतीनं सर्वांना समान करण्याचं काम कृती दलाकडे सोपवलं आहे. आठवडाभरात हे कृती दल कार्यरत होईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image