उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येतली घट सलग 15व्या दिवशीही कायम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सलग 15 व्या दिवशी नव्या कोरोना बधीतांपेक्षा बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली. देशभरात काल 2 लाख 59 हजार कोविड रुग्ण बरे झाले असून देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 90 पूर्णांक 34 शतांश टक्के झाला आहे. देशात आत्तापर्यंत 48 लाखांच्या वर रुग्ण कॉविड 19 या आजरातून बरे झाले आहेत.

कोविड 19 च्या या दुसऱ्या लाटेत आत्ता रुग्ण आढळण्याच प्रमाण कमी होत असल्याचं आरोग्य विभागाने म्हंटल आहे. देशभरात काल 1 लाख 86 हजारांच्या वर नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. देशात आत्ता 23 लाख रुग्ण उपचार घेत आहे. या आजारामुळे काल दिवसभरात 3 हजार 660 रुग्णांचा मृत्यू झाला.