मेट्रो-३च्या पॅकेज-१चे ९६ टक्के भुयारीकरण पूर्णमुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे ऐतिहासिक वारसा इमारती जवळील मेट्रो-३ च्या पॅकेज-१ चे ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या पॅकेज अंतर्गत भुयारीकरणाचा ३७वा टप्पा पूर्ण झाला. हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा डाऊन लाईन मार्गाचा ५६९ मी. भुयारीकरणाचा टप्पा दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरणासह पॅकेज-१ मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण २.९ किमी लांबीचे डाऊन लाईनचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. ऐतिहासिक वारसा इमारती आणि समुद्रानजीक भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. मात्र आमच्या अभियंत्यांच्या आणि कामगारांची उत्कृष्ट टीम हे शिवधनुष्य लीलया पेलत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे ऐतिहासिक वारसा इमारती जवळील मेट्रो-३ च्या पॅकेज-१ चे ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या पॅकेज अंतर्गत भुयारीकरणाचा ३७वा टप्पा पूर्ण झाला.

हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा डाऊन लाईन मार्गाचा ५६९ मी. भुयारीकरणाचा टप्पा दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरणासह पॅकेज-१ मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण २.९ किमी लांबीचे डाऊन लाईनचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

ऐतिहासिक वारसा इमारती आणि समुद्रानजीक भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. मात्र आमच्या अभियंत्यांच्या आणि कामगारांची उत्कृष्ट टीम हे शिवधनुष्य लीलया पेलत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.