महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षा पुढं ढकलल्या

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढं ढकलल्या असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं. या परीक्षा आता येत्या जून महिन्यात होतील. परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जाहीर करेल.

या परीक्षा पुढे ढकलण्या बाबत आपली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.