क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

  क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : “क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मांधतेसारख्या अनिष्ठ चाली-रितींविरुद्ध विचारांचा लढा पुकारला. बहुजनांच्या दु:खाचं, दारिद्र्याचं, मानसिक गुलामगिरीचं मूळ ‘अविद्ये’त असल्याचं सांगत त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. देशाला पुढे नेणारा, देशात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवणारा सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महात्मा जोतिराव फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्य व विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image