कोरोना पार्श्वभूमीवर इयत्ता १० आणि १२ वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाववाढल्यामुळे राज्य शिक्षणमंडळाच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या या वर्षीच्या इयत्ता १०वीआणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली. यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीतहा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयानुसार १० वीच्या परीक्षा जुन महिन्यामधेतर १२वीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीला घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.