अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्री पदाचा राजीनामा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री पदावर राहणं नैतिकदृष्टया योग्य वाटत नाही, म्हणून मी स्वतःहून पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून आपल्याला कार्यमुक्त करावं असं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.