गुड फ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मरण

  गुड फ्रायडेनिमित्त येशूंच्या मानवतावादी विचारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्मरण

मुंबई :- गुड फ्रायडेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येशू ख्रिस्ताच्या दया, क्षमा, शांती, प्रेम, त्यागाच्या संदेशाचं व सेवाकार्याचं स्मरण केलं असून येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी, असं आवाहन केले आहे.

गुड फ्रायडेच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,  येशूंच्या प्रेम, त्याग, दया, क्षमा, शांतीसारख्या उदात्त विचारांचं, मानवसेवेच्या कार्याचं स्मरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी येशूंनी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी केलेला त्याग आणि दिलेले विचार मानवजातीचं कल्याण करत राहतील. कोरोनामुळे जग संकटात असताना येशूंचा मानवसेवेचा, विश्वकल्याणाचा संदेशच जगाला वाचवणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image