राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांविरुद्ध परमबीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव  

 

मुंबई (वृत्तसंस्था) : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यसरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे. १९ एप्रिलला आपण पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी सरकार आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या तक्रारी दाखल करणार असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं.

तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारं आपलं पत्र मागं घ्यावं, असा सल्ला पांडे यांनी दिला होता, असंही या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर न्यायालयानं राज्यसरकारला उत्तर मागितलं असून या याचिकेची सुनावणी येत्या ४ मे रोजी ठेवली आहे.