कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहिर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या प्रत्येक मात्राचे नवे दर आज जाहिर केले आहेत. त्यानुसार सरकारी रुग्णालयांना प्रति मात्रा ४०० रुपये असतील. तर खाजगी रुग्णालयांना प्रति मात्रासाठी ६०० रुपये दर आकारला जाईल.

केंद्रांच्या आरोग्य आणि अर्थविभागानं कोविड लसीकरण अभियानाला गती देण्यासंदर्भात उचलेल्या पावलाचं त्यांनी स्वागत केलं.