मुंबईतल्या अँटिला स्फोटक प्रकरणी एनआयएकडून पोलीस निरीक्षकाला अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली आहे. याप्रकरणी अटक झालेले ते तिसरे पोलीस कर्मचारी आहेत. याआधी सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक झाली होती.