44 मेट्रिक टन प्राणवायू घेवून ऑक्सिजन एक्सप्रेस मुंबईकडे रवाना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गुजरातमधे  जामनगर इथल्या हापा रेल्वे स्थानकातून 44 मेट्रिक टन प्राणवायू घेवून ऑक्सिजन एक्सप्रेस आज कळंबोली रेल्वे स्थानकात दाखल झाली.  या एक्स्प्रेस मध्ये 3 टँकर चा समावेश आहे. या 3 टँकरमध्ये 15 मेट्रिक टन प्राणवायूचा समावेश आहे. या 3 टँकर पैकी 2 मुंबईसाठी आणि 1 पुण्यासाठी आहेत.