गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांकडून उद्ध्वस्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या अबुजामाद इथले नक्षलवाद्यांचे एक शस्त्र निर्मिती केंद्र राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ही पोलीस कारवाई ४८ तास सुरु होती आणि त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे गृहमंत्र्यानी अभिनंदन केले आहे.