उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू,अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी जनतेला होळीच्या शुभेच्या दिल्या.

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभर आज रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण सगळ्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य आणणारा ठरो अशा शब्दांत शुभेच्छा देतानाच सण साजरा करताना सर्वांनी कोविडविषयक नियमांचं पालन करत योग्य खबरदारी घ्या असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या असून हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी लोकांना होळीच्या शुभेच्या दिल्या आहेत. होळी हा आनंद आणि सकारात्मकतेचा सण आहे. आपसातले भेद विसरायला लावून लोकांना एकत्र आणणारा हा सण सध्याच्या कठीण काळात महत्त्वाचा संदेश देणारा आहे, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसंच ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला ट्विटरच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.