संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचं कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ आणि लोकसभेचं कामकाज दुपारी चार ते रात्री नऊ या कालावधीत होणार आहे.

या अधिवेशनाचं कामकाज पुढच्या महिन्याच्या ८ तारखेपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा २९ जानेवारी रोजी सुरू झाला होता. राज्यसभेचं कामकाज १२ फेब्रुवारी रोजी; तर लोकसभेचं कामकाज १३ फेब्रुवारी रोजी संस्थगित करण्यात आलं होतं.