दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मेळाव्याचं उद्घाटन झालं. यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ही या प्रदर्शनाची मुख्य संकल्पना असून, दीडशे प्रकाशक यात सहभागी झाले आहेत.