पात्र व्यक्ती चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकता - केंद्रीय आरोग्य मंत्रालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येदेखील लस दिली जाणार असून लसीच्या प्रत्येक मात्रेसाठी जास्तीत जास्त अडीचशे रुपये आकारण्याची परवानगी या रुग्णालयांना देण्यात आली आहे.१० हजार सरकारी रुग्णालयांमध्ये लस मोफत दिली जाणार असून २० हजार खाजगी रुग्णालयांना लसीकरण मोहीम सशुल्क राबवण्याची परवानगी देण्यात आली आहे.