हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण

 

पुणे : थोर क्रांतिकारक  हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आ. दिलीप मोहिते पाटील,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, खेडचे उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, गट विकास अधिकारी शरद जोशी, तहसीलदार वैशाली वाघमारे,

प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडिबा टाकळकर, सचिव मुकुंद आवटे, देवेंद्र बुट्टे पाटील, भगवान पोखरकर,

बाळासाहेब कानडे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या डॉ. कस्तुरी पायगुडे-राणे, पोलिस निरीक्षक सचिन गुरव, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, प्रकाश पाटील, प्रकाश वाडेकर, राजेंद्र वाळुंज, अशोक दुगड, हिरामण सातकर आदी उपस्थित होते.

प्रारंभी  शहीदांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यानंतर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थळांस भेट देऊन अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.