राज्यात ३६ हजार ९०२ नव्या कोविड रुग्णांची नोंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १७ हजार १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक दोन दशांश टक्के झालं आहे. काल ३६ हजार ९०२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २६ लाख ३७ हजार ७३५ झाली आहे.

सध्या राज्यात २ लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार ९०७ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे.

मुंबईत काल १ हजार ६५८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. आतापर्यंत ३ लाख ३५ हजार २६ १ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.काल ५ हजार ५१३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची संख्या ३ लाख ८५ हजार ६ २८ झाली आहे. मुंबईला रुग्ण दुपटीचा कालावधी ६ ८ दिवसांवर आलाय. सध्या ३७  हजार ८०४ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईत काल ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण  मृतांचा आकडा ११ हजार ६ २९ वर पोचला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात काल ६ ४४ तर आतापर्यंत २७  हजार ४८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ९०३ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्ण संख्या ३४ हजार ५ झाली आहे. सध्या सहा हजार २७ ८ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रायगड जिल्हयात काल ३२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ६ ५ हजार १४४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल ४९१ नवे रुग्ण आढळल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २१४ वर गेली आहे. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७ ४८ रुग्ण दगावले आहेत.

सातारा जिल्ह्यात बरे झालेल्या ३२४ रुग्णांना घरी पाठवलं. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ४०६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून ६ ३ हजार ७३९ वर पोचली आहे. सध्या २ हजार ५३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारानं १ हजार ८९३ रुग्णांचा बळी घेतला आहे.

नाशिक जिल्ह्यात काल चार हजार ९९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. सध्या २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २८३ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ४७  हजार २६ ० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १४७ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे, रुग्णांचा आकडा ५० हजार ५४० झाला आहे. सध्या १ हजार ४९९ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७ ८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या तीन हजार २१८ रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता ३ लाख दोन हजार ५५९ रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या सहा हजार ४२४ नोंदली आहे.

अंबरनाथमध्ये १२०, बदलापूरमध्ये १७१ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये ६९ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत २० हजार ७२९ आणि आतापर्यंत ६०५ मृत्यू झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात  काल २५१, तर आतापर्यंत १० हजार ६ २३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल २६ ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, बधितांचा आकडा १२ हजार २५८ वर पोचला आहे. सध्या १ हजार २६ ० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३७ ५ रुग्ण दगावले आहेत.

Popular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image