कल्पकतेनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं माळरानावरही भरपूर पाणी उपलब्ध करता येऊ शकतं - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कल्पकतेनं आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काम केलं, की माळरानावर देखील पाण्याचं तळं फुलतं, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक पाणी दिनानिमित्त पाणी फौंडेशनच्या वतीनं आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या वर्षपुर्ती निमित्त वर्षा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचं आपण नियोजन करायला हवं. आपण रॉकेट युगात आलो, पण आपल्याला पाण्याची निर्मिती करता आली नाही. आपल्याकडे योजनांचा पाऊस आहे, पण अंमलबजावणीच्या बाबतीत बोंब आहे, अशी खंत ठाकरे यांनी बोलून दाखवली. या प्रसंगी आमिर खानचं आणि त्यांच्या पाणी फौंडेशनचं त्यांनी कौतूक केलं.