उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना ही उत्पादनवाढीला चालना देण्याची उत्तम संधी - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध क्षेत्रांसाठी लागू केलेली उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना त्या त्या क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना देण्यासाठीची एक उत्तम संधी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नीती आयोगाच्या प्रशासनिक परिषदेची ६ वी बैठक पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली काल दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झाली; त्यावेळी ते बोलत होते. सहकारी संघराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रित काम करण आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.