भारत आणि चीनच्या सैन्याकडून लडाख सीमेवरून माघार घेण्यास सुरूवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज राज्यसभेत पूर्व लडाखमधल्या सध्याच्या स्थितीबाबत निवेदन करणार आहेत.

आमच्या बीजिंगमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पँगोंगत्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून चीन आणि भारताच्या आघाडीवरील सैन्यानं कालपासून माघार घेण्यास सुरुवात केल्याचं लेखी निवेदन चीनच्या संरक्षण मंत्रालयानं त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं आहे.दोन्ही देशांदरम्यान लष्करी पातळीवरील चर्चेच्या नवव्या फेरीत झालेल्या एकमतानुसार सैन्यमाघारी होत असल्याचं, चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.