थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: “थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला. कुष्ठरुग्णांच्या जखमांवर उपचार करताना, त्यांच्या पुनर्वसनाचे काम केले. कुष्ठरुग्णांना समाजात पूर्वीचे स्थान, सन्मान, प्रतिष्ठा पुन्हा मिळवून दिली. आदरणीय बाबा आमटे हे सुधारणावादी, पर्यावरणवादी, कृतीशील विचारवंत होते. महिलांच्या आत्मसन्मानासाठी लढणारे ‘अभय साधक’ होते. ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता राखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या कार्याचे स्मरण करुन आदरांजली वाहिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.